टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेत आज जम्मू काश्मीरच्या कलम 370 बाबत चर्चा सुरु होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत 370 हटवण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला. त्यानंतर विरोधकांनी सरकारच्या या प्रस्तावाला प्रखर विरोध दर्शवला. मात्र गेली ८ – ९ तास झालेल्या चर्चेनंतर लोकसभेतही 370 कलम हटवण्याच्या प्रस्तावला मंजुरी मिळाली. सदर विधेयक हे 370 विरुद्ध 70 मतांनी मंजूर झाले.
मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या अधिवेशनात महत्वाच्या विधेयकांना प्रथम प्राधान्य देऊन संसदेत पारित करण्याचा धडाका लावला होता. तर जम्मू काश्मीरला विशेष राज्य म्हणून दिलेले कलम 370 हटवण्यासाठी मोदी सरकार गेले दोन दिवस सभागृहात प्रयत्न करत होते. सोमवारी देशाच्या वरिष्ठ सभागृहात 370 कलम हटवण्याचा प्रस्ताव बहुमतात पारित झाला. तर आज लोकसभेतही प्रखर विरोधानंतर विधेयक संमत झाले.
Resolution revoking Article 370 from Jammu & Kashmir passed in Lok Sabha pic.twitter.com/BhDpDJV0Bs
— ANI (@ANI) August 6, 2019
कलम 370 देऊन जम्मू – काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिला गेला होता. मात्र या कलम 370मुळे जम्मू काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहा पासून वंचित राहिला. तसेच कलम 370 मुळे जम्मू काश्मीरमध्ये केवळ बेरोजगारी , दहशतवाद , निरक्षरता , मागासलेपणा वाढला. त्यामुळे जम्मू – काश्मीरचा विकास होऊ शकला नाही, असा खुलासा अमित शहा यांनी केला. मात्र हे कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीर भारताच्या मुख्य प्रवाहात येईल. कश्मीरी नागरिकांना संविधानाने दिलेले सर्व अधिकार प्राप्त होतील. आरक्षण, व्यवसायिक विकास, औद्योगिकरण, शिक्षण या साऱ्या मुलभूत विकास होईल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला.
गौतम गंभीरने घेतला आफ्रिदीचा समाचार म्हणाला…
अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यावर सोनिया गांधी नाराज, भर सभागृहात टाकला नाराजीचा कटाक्ष
दिल्लीपासून गावखेड्यातल्या गल्लीपर्यंत साजरा होतोय कलम ३७० हटवण्याचा आनंद
कलम ३७० बाबत आज भारताने काश्मीरला दगा दिला : फारुख अब्दुल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

