टीम महाराष्ट्र देशा : जम्मू काश्मीरविषयीचे बहुचर्चित कलम ३७० राज्यसभेनंतर लोकसभेतही मंजूर झाले आहे. हे विधेयक ३७० विरुद्ध ७० मतांनी मंजूर झाले. सरकारच्या या निर्णयामुळे सगळीकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याविषयी मोठ विधान केले आहे.
शरद पवार यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० काढण्यापूर्वी तेथील स्थानिक नेत्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला किंवा पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांना सांगूनही यापूर्वी निर्णय घेण्यात आले होते. या सगळ्यांनी तो भाग भारतात राहायला पाहिजे अशी भूमिका घेतली होती. त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं विधान केले आहे.
पुढे बोलताना त्यांनी ‘फक्त जम्मू काश्मीर नाही, तर ईशान्य भारतातही बाहेरच्या व्यक्तीला जमीन खरेदी करता येत नाही. अगदी महाराष्ट्रातही शेतकरी नसलेल्यांना कृषी जमीन खरेदी करता येत नाही ही वस्तूस्थिती आहे. तिकडे लोकं आनंद व्यक्त करत असल्याचं सांगितलं जातंय, ते आम्हाला पाहू तर द्या, तिकडे ४० हजार सैन्य पाठवलं, इंटरनेट बंद केलं मग ते कसं दिसणार असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
दरम्यान, हे कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीर भारताच्या मुख्य प्रवाहात येईल. कश्मीरी नागरिकांना संविधानाने दिलेले सर्व अधिकार प्राप्त होतील. आरक्षण, व्यवसायिक विकास, औद्योगिकरण, शिक्षण या साऱ्या मुलभूत विकास होईल, असं सरकारच म्हणने आहे.
#Article370 : आजचा दिवस ऐतिहासिक; आदित्य ठाकरेंकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत
कलम 370 हटविण्यास लोकसभेची मंजुरी, 351 विरुद्ध 72 मतांनी प्रस्तावावर शिक्कामोर्तब
अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यावर सोनिया गांधी नाराज, भर सभागृहात टाकला नाराजीचा कटाक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

