Share

पाक व्याप्त काश्मीरमध्ये भाजपचेचं २१ आमदार असणार, अमित शहांनी केली गर्जना

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेत आज कलम 370 हटवण्याच्या मुद्यावर चर्चा सुरु आहे. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिली आहेत. कलम 370 बाबत बोलताना अमित शहांनी येत्या काळात पाक व्याप्त काश्मीरमध्येही भाजपचे २१ आमदार असतील असा दावा केला. याआधीही भाजपने निवडणूक आयोगाकडे पाक व्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळात महत्वाच्या विधेयकांना प्रथम प्राधान्य देऊन संसदेत पारित करण्याचा धडाका लावला आहे. तर जम्मू काश्मीरला विशेष राज्य म्हणून दिलेले कलम 370 हटवण्यासाठी मोदी सरकार गेले दोन दिवस सभागृहात प्रयत्न करत आहे. राज्याच्या वरिष्ठ सभागृहात ३७० कलम हटवण्याचा प्रस्ताव बहुमतात पारित झाला आहे. मात्र यावर जम्मू – काश्मीरच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच सभागृहातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही मोदी सरकारच्या या प्रस्तावावर प्रश्न निर्माण केले आहेत.

यावर बोलताना शहा म्हणाले की, कलम 370 मुळे जम्मू काश्मीर भारताला न जोडता तोडला गेला. कलम 370मुळे जम्मू काश्मीरच्या नागरिकांना मुलभूत अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले. बेरोजगारी वाढवली, निरक्षरता वाढली, स्त्रियांना हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. देश आता विकासाकडे वाटचाल करत आहे. मात्र जम्मू काश्मीर युगाच्या मागे पडले आहे. याला केवळ कलम 370चं कारणीभूत आहे, असे स्पष्टीकरण अमित शहा यांनी यावेळी दिले. तर कलम 370 हटवल्यानंतर येत्या काही काळात पाक व्याप्त काश्मीरमध्ये देखील भाजपचे 21 आमदार असतील असा दावा केला.

कलम ३७० हटवण्याचा निर्णय भारतासाठी विनाशकारी ठरेल; मेहबूबा बरळली

काश्मिरात पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, व्यवसाय व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील’

UAPA विधेयक मंजूर, दहशतवादावरून अमित शहा सभागृहात झाले आक्रमक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!