Share

आता पाक लष्कराला भारतावर हल्ल्याचा आदेश देऊ का ? – इम्रान खान भंजाळला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: जम्मू कश्मीरमधून कलम ३७० हटवत राज्याच्या पुनर्स्थापनेचा ऐतिहासिक संकल्पाला भारतीय संसदेत मंजुरी देण्यात आली आहे. सोमवारी राज्यसभेच्या मंजुरीनंतर काल लोकसभेतही बहुमताने कलम ३७० हटवण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता जम्मू काश्मीर आणि लडाखची दोन वेगळ्या केंद्रशासित प्रदेशात विभागणी केली जाणार आहे, तर कश्मीरला देण्यात आलेले विशेषाधिकार समाप्त झाले आहेत.

भारत सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयावर पाकिस्तानचा जळफळाट होताना दिसत आहे. पाकिस्तानच्या संसदेत आज मोठा राडा झाला असून विरोधीपक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांना धारेवर धरले आहे. यावेळी पाकिस्तान सरकारनं भारताला जशीच्या तशी तीव्र प्रतिक्रिया द्यायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी केली. शरीफ यांना उत्तर देताना इम्रान खान यांनी भंजाळल्याप्रमाणे उत्तरे दिली आहेत.

मी पाकिस्तानी सैनिकांना भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यायला हवा?, हे विरोधी पक्षनेत्यांना हवंय का ? अशी प्रतिक्रिया इम्रान खान यांनी दिली. पाकिस्तानातील नेते आणि त्यांच्या पंतप्रधानाकडून वापरण्यात येणारी भाषा पाहता भारताच्या निर्णयामुळे जळफळाट होताना दिसत आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी देखील भारत खतरनाक खेळ खेळत असल्याचं म्हंटले आहे. भारताच्या कृतीचा परिणाम संपूर्ण भागावर होणार आहे, तो भयानक असणार असून या निर्णयामुळे काश्मीर मुद्दा आणखी किचकट बनविण्याचा आरोप त्यांनी लावला आहे.

वैद्यकीय प्रवेशास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा, आरक्षण विधेयक विधान परिषदेत मंजूर

जम्मू-काश्मीर कलम 370 रद्द; जम्मू आणि काश्मीर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले : संजय काकडे 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!