🕒 1 min read
मुझफ्फरनगर : कोल्हापूर पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. बिहार मधल्या मुझफ्फरनगर येथील बोचहां या मतदारसंघात भाजपला हा जबर धक्का बसला आहे. बिहारमध्ये विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने बोचहां या मतदारसंघात विजय खेचून आणला आहे. आरजेडी उमेदवार अमरकुमार पासवान हे विजयी झाले आहेत, त्यांनी भाजप उमेदवाराचा तब्बल ३६ हजार मतांनी पराभव केला आहे.
दिवंगत आमदार मुसाफीर पासवान यांचे पुत्र अमरकुमार पासवान यांना आरजेडीने उमेदवारी देऊन मोठी खेळी केली होती. पासवान यांना ८२ हजार ५६२ मते मिळाली आहेत, याचवेळी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने माजी मंत्री रमाई राम यांच्या कन्या गीता कुमारी यांना तिकीट दिले होते. त्यांना ४५ हजार ९०९ मते मिळाली. पासवान यांनी कुमार यांचा तब्बल 36 हजार मतांनी पराभव केला आहे. सत्ताधारी भाजप आणि नितीश कुमारांचा पक्ष जनता दल युनायटेडला तेजस्वी यादव यांनी मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.
विकासशील इन्सान पार्टीचे आमदार मुसाफिर पासवान यांच्या मृत्यूमुळे बोचहां मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने गीता कुमारी यांना उमेदवारी दिली तर आरजेडीने अमरकुमार पासवान यांना उमेदवारी दिली होती. या पोटनिवडणुकीत 59.20 टक्के मतदान झाले होते. एकूण 2 लाख 90 हजार 544 मतदारांनी मतदान केले होते.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोल्हापूरच्या निकालानंतर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- IPL 2022च्या मध्यावर BCCIनं घेतला ‘मोठा’ निर्णय; एक लाख भरा आणि…!
- मुश्रीफांचा रामनवमीला जन्म झालाच नाही, जनतेची केली फसवणूक – समरजित घाटगे
- IPL 2022 MI vs LSG : रोहितनं जिकला टॉस; मुंबई संघातून ‘या’ खेळाडूचं पदार्पण; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- IPL 2022 : आज अर्जुन तेंडुलकर खेळणार? मुंबई इंडियन्सच्या ‘त्या’ पोस्टमुळं चर्चेला उधाण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
