Share

IPL 2022 MI vs LSG : रोहितनं जिकला टॉस; मुंबई संघातून ‘या’ खेळाडूचं पदार्पण; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये, आज मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबईने आतापर्यंतचे पाचही सामने गमावले आहेत आणि संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. दुसरीकडे, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील खेळणारा लखनऊ त्यांच्या पाचपैकी तीन सामने जिंकून पाचव्या स्थानावर आहे. मुंबई संघाने आज फॅबियन एलनला संधी दिली आहे.

स्पर्धेतील आतापर्यंतचा प्रवास मुंबई इंडियन्ससाठी दुःस्वप्नसारखा राहिला आहे. या संघाला आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही आणि आजच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर स्पर्धेचा प्रवास जवळपास संपुष्टात येईल. लखनऊला मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध तीन धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मार्कस स्टॉइनिसला आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आणण्याची रणनीती संघासाठी चुकीची ठरली. संघातील खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत पण त्यांनी आतापर्यंत दमदार कामगिरी दाखवलेली नाही आणि मुंबईच्या कमकुवत गोलंदाजीसमोर फलंदाज फायदा उठवू शकतात.

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स.

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, आयुष बडोनी, जेसन होल्डर, कृणाल पंड्या, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022: पंतची दिल्ली फाफच्या बँगलोरला टक्कर देण्यास सज्ज! सामन्यात दिसू शकतात मोठे बदल

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रच नाही तर देशही अंधारात – नाना पटोले

परिवाराचे घोटाळे बाहेर यायला लागले म्हणून उद्धव ठाकरेंची स्टंटबाजी सुरु – किरीट सोमय्या

राज ठाकरेंची मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी, पण कायदा काय सांगतो? जाणून घ्या…

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!