मुंबई : आयपीएल २०२२ स्पर्धा २६ मार्चपासून सुरू झाले आहे. यंदापासून लीगमध्ये एकूण १० संघ उतरले आहेत. अंतिम सामना २९ मे रोजी होणार आहे. २०१८ पासून आयपीएलमध्ये उद्घाटन आणि समारोप समारंभ होत नाहीत. मात्र यंदा समारोप समारंभ आयोजित करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यासाठी मंडळाने निविदाही मागवल्या आहेत. मात्र, करोनामुळे चालू हंगामात उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. यावेळी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या रूपाने दोन नवीन संघ मैदानात उतरले आहेत. यावेळी ६० ऐवजी ७४ सामने खेळवले जातील.
बोर्डाचे सचिव जय शाह यांनी जारी केलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे, की समारोप समारंभाशी संबंधित निविदा २५ एप्रिलपर्यंत खरेदी करता येतील. यासाठी एक लाख रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. निविदेत भाग घेणारे पक्ष बीसीसीआयला या संदर्भात ई-मेलद्वारे कळवू शकतात. आयपीएलच्या अंतिम सामन्याचे ठिकाण अद्याप जाहीर झाले नसले तरी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होण्याची शक्यता आहे.
???? NEWS ????: BCCI announces release of Request for Proposal for Staging the Closing Ceremony of IPL 2022. #TATAIPL
More Details ????https://t.co/uyN6sFY2Hl pic.twitter.com/6kXTcXN8ZR
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2022
२०१९मध्ये पहिल्यांदाच आयपीएलचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या सोहळ्याची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला होता. २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनामुळे सामने चाहत्यांशिवाय पार पडले. यंदा लीग फेरीचे सामने ४ ठिकाणी खेळवले जात आहेत. मात्र २५ टक्के चाहत्यांना परवानगी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

