मुंबई: आयपीएलच्या यशस्वी फ्रँचाईझ असलेल्या मुंबई इंडियन्समध्ये अर्जुन तेंडुलकरला जवळपास तीन वर्षे झाली आहेत. मात्र, आतापर्यंत त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आलेली नाही. आज लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने एकही सामना जिंकलेला नाही. आज त्याचा या मोसमातील सहावा सामना आहे. पण, त्याआधी आज अर्जुन तेंडुलकरच्या पदार्पणाची मोठी बातमी समोर येत आहे.
मुंबई इंडियन्सने (MI) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्याद्वारे आज अर्जुन तेंडुलकर (Arjun tendulkar) आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबई इंडियन्सच्या या पोस्टवर सारा तेंडुलकरने केलेली कमेंट खूप वेगाने व्हायरल होत आहे. सामन्याच्या एक दिवस आधी मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून अर्जुन तेंडुलकरचा फोटो शेअर केला होता. ज्याखाली त्यांनी लिहले “MI vs LSG आमच्या डोक्यात सुरु आहे”
https://www.instagram.com/p/CcXeOe2MkkM/
अर्जुन तेंडुलकरबद्दल सांगायचे झाले तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो आतापर्यंत फक्त दोन टी-२० सामने खेळताना दिसला आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी करताना केवळ २ विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे अर्जुन हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि वेगवान गोलंदाजीसोबतच तो त्याच्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. ज्यामुळे आज त्याला संधी मिळाल्यास त्याची प्रतिभा लोकांना समजेल.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : CSKचा दीपक चहर गेला स्पर्धेबाहेर, तरीही मिळणार १४ कोटी; वाचा कसे!
- IPL 2022: पंतची दिल्ली फाफच्या बँगलोरला टक्कर देण्यास सज्ज! सामन्यात दिसू शकतात मोठे बदल
- केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रच नाही तर देशही अंधारात – नाना पटोले
- परिवाराचे घोटाळे बाहेर यायला लागले म्हणून उद्धव ठाकरेंची स्टंटबाजी सुरु – किरीट सोमय्या
- राज ठाकरेंची मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी, पण कायदा काय सांगतो? जाणून घ्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

