Share

“रोहित लोकांचा विश्वास सार्थकी ठरवेल”; कर्जत नगरपंचायतीवर ताबा मिळवल्यानंतर अजित पवारांनी केले कौतुक

Published On: 

मुंबई : राज्यात नगरपंचयातीच्या निवडणुका पार पडल्या असून आता निकाल जाहीर होत आहेत. दरम्यान, सर्वच पक्षांमध्ये चांगलीच चुरस दिसून येत आहे. राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला असून कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली वर्चस्व निर्माण केलं आहे. या निवडणुकीत १७ पैकी १२ जागा जिंकून राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली आहे. त्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवारांचे कौतुक केले आहे.

कर्जत नगरपंचायतीत १७ पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने १२ आणि काँग्रेसने ३ अशा एकूण १५ जागांवर विजय मिाळवला आहे. भाजपला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. कर्जतमध्ये आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती, मात्र यावर आता रोहित पवार यांनी बाजी मारली असल्याचे दिसत आहे.


दरम्यान अजित पावर म्हणाले, “रोहितचा मला फोन आला होता. कर्जतची एकतर्फी निवडणूक रोहितने केली होती. रोहितने कष्ट घेतले होते. भरपूर मेहनत घेतली. लोकांचा विश्वास रोहित पवार सार्थकी ठरवतील. कुठलीही निवडणूक म्हटलं की स्थानिक राजकीय परिस्थिती बघून लोक मतदान करत असतात.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!