Share

कर्जत नगर पंचायतीत राष्ट्रवादीचा भाजपला दणका

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर: सध्या राज्यात नगरपंचयातीच्या निवडणुका पार पडल्या असून आता निकाल जाहीर होत आहेत. मतमोजणीला पक्षांमध्ये चांगलीच चुरस दिसून येत आहे. राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. या निवडणुकीत १७ पैकी १२ जागा जिंकून राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली आहे.

आज सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीलाच कर्जत नगरपंचायतीचा निकाल लागला आहे. त्यात राष्ट्रवादीला १७ पैकी १२ जागा मिळाल्या असून भाजपला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती, मात्र यावर आता रोहित पवार यांनी बाजी मारली असल्याचे दिसत आहे.

भाजपचे राम शिंदे (BJP leader Ram Shinde) यांनी भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास दाखवला होता. तसेच रोहित पवार यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. राम शिंदे म्हणतात, दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जतदारांनी पाहिली नव्हती, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!