मुंबई : सुपरस्टार रजनीकांतची लेक ऐश्वर्या (Aishwarya) आणि अभिनेता धनुष (Dhanush) यांच्या घटस्फोटाच्या (divorced) बातमीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. तसेच सोशल मीडियावर याबद्दल जोरदार चर्चा होत आहे. त्यानंतर आता त्यांनी सोशल मीडियाद्वारे घटस्फोट घेत असल्याचे सांगितल्यानंतर चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना देखील विचार करायला लावत असून त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न देखील बऱ्याच जणांना पडतो आहे. नुकतचं त्यांच्या घटस्फोटाचे कारण समोर आले आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कपल धनुष आणि ऐश्वर्या हे चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धनुष हा त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये सतत व्यस्त असतो. तो सतत बाहेर असतो. यासर्व गोष्टींमुळे त्याला पत्नी ऐश्वर्याला वेळ देणे शक्य होत नव्हते. त्याच्या अभिनयाबद्दल अगोदर विचार करतो आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींना याबाबत माहिती आहे. काही वर्क कमिटमेंटमुळे त्याने कुटुंबीयांकडे फारसे लक्ष दिलेले नाही. तो सतत शूटिंगसाठी अनेक ठिकाणी फिरत असतो. विशेष म्हणजे ऐश्वर्यासोबत वाद सुरु असताना देखील धनुष नवे चित्रपट साइन करत होता. यामुळे त्याने विभक्त होण्यापूर्वी त्यांनी बराच विचार केला, असून याबद्दल आता चर्चा होत आहे.
धनुष आणि ऐश्वर्याची ‘ती’ भेट
अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या (Dhanush and Aishwarya) यांची पहिली भेट २००२ मध्ये ‘काढाल कोंडे’ (kadhal konden) चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी त्यांची पहिली भेट झाली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी ऐश्वर्या वडील रजनीकांत यांच्यासोबत तिथे उपस्थित होती. त्यावेळी धनुषचं परफॉर्मन्स पाहून ती त्याच क्षणी त्याच्या प्रेमात पडली होती. विशेष म्हणजे स्क्रिनिंगच्या दुसऱ्याच दिवशी ऐश्वर्याने धनुषच्या घरी पुष्पगुच्छ पाठवत त्याला संपर्कात रहा असं सांगितलं होतं. ऐश्वर्याने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर या दोघांची मैत्री वाढत गेली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. त्यानंतर २००४ रोजी धनुष आणि ऐश्वर्याने घरातल्यांच्या संमतीने लग्न केलं. या दोघांचा लग्न सोहळा दाक्षिणात्य कलाविश्वातील गाजलेल्या लग्नसोहळ्यांपैकी एक होता. त्यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे यात्रा आणि लिंगा असे आहे. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे.
महत्वाच्या बातम्या:


