🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रातील १०६ नगरपंचायंतीच्या निवडणुकीची (Maharashtra Nagar Panchayat Election ) दोन टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता राज्यभरात निकालाची उत्सुकता लागलेली आहे. मतमोजणीला सुरुवात देखील झाली असून त्याचे निकाल देखील हळूहळू जाहीर होताना दिसत आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानं ओबीसींच्या जागांशिवाय निवडणूक घेण्याचं ठरवलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राखीव ठेवलेल्या जागांसाठी खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार काल ९५ नंगरपंचायती आणि भंडारा (Bhandara) आणि गोंदियातील (Gondia) जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील काही जागा, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण मध्ये शिवसेना नेते गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात राष्ट्रवादीचं आव्हान आहे. कोरेगाव नगरपंचायतीमध्ये शिवसेना आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनेलमध्ये लढत होत आहे. सांगलीतील कवठेमहाकाळमध्ये रोहित पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. पुण्यातील देहूमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि भाजपच्या बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. त्यामुळे आता राज्यभारात निकालाची रणधुमाळी बघायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘नाना पटोलेंवर कारवाई झाली नाही तर…’; भाजप शिष्टमंडळांचं राज्यपालांना निवेदन
-
‘मोदींच्या हत्येच्या कटाला राहुल गांधींची सहमती?’; चित्रा वाघ यांचा सवाल
-
अक्षयचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट होणार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित; जाणून घ्या तारीख
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
