🕒 1 min read
सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील (Rohit Patil) यांनी अखेर करुन दाखवलं आहे. राष्ट्रवादीने कवठेमहांकाळ नगरपंचायत (kavathe mahankal nagar panchayat election 2022 result) निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलला ६ जागांवर समाधान मानावं लागलं.
रोहित पाटील (Rohit Patil) यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता. रोहित पाटील यांनी दिलेला इशारा आता निवडणुकीच्या निकालात सत्यात उतरवला. विरोधकांना खरोखरच आबांची म्हणजेच आरआर पाटील (R.R. Patil) यांची रोहित पाटील यांनी आठवण करून दिली आहे.
या निवडणुकीच्या विजयानंतर आणि कवठे महंकाळ नगरपंचयातीवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर रोहित पाटील यांना त्यांचे वडील आरआर पाटील यांची आठवण आली. रोहित पाटील म्हणाले की, आबांची आठवण येत आहे. त्यांचं स्वप्नं होतं की कवठे महंकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता स्थापन व्हावही आणि आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता स्थापन झाली असून आबांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
