🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यासारख्या प्रसिद्ध मालिकांमधून अभिनेत्री घराघरात पोहचली आहे. प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा यामध्ये सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्याचबरोबर रानबाजार वेबसिरीजमुळे देखील प्राजक्ता चर्चेत आहे. अभिनेत्री आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रानबाजार या वेबसिरीजमधील बोल्ड सिनबद्दल देखील अभिनेत्रीने तिचे मत मांडले आहे. या बोल्ड सिनबद्दल अभिनेत्री म्हणाली, ” माझ्या बोल्ड सिनबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा चालू असते, पण याचा मला फारसा काही फरक पडत नाही. माझ्या मते इंटिमेन्ट सिन पेक्षा या सिरीजचा कन्टेन्ट जास्त बोल्ड आहे. असं अभिनेत्री म्हणाली.
जाणून घ्या बॉलिवुडविषयी अभिनेत्री काय म्हणाली?
प्राजक्ता आता बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. त्यासाठी ती बॉलिवूड चित्रपटांसाठी ऑडिशन सुद्धा देत आहे. याविषयी पुढे ती म्हणाली, “मी सहायक भूमिका करू शकत नाही लोकांनी माझ्यामधील कलेला ओळखावं अशी माझी इच्छा आहे. मला बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधेही मला मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायचे आहे. आता हिंदी चित्रपट आणि सिरीजमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मराठी चेहरे पाहायला मिळत आहेत”.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
