Share

IND vs SA : भारतीय संघाच्या पराभवावर बोलताना माजी खेळाडू झहीर खान म्हणाला…!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकाने ४ गडी राखून भारताचा पराभव केला. यावर बोलताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने प्रतिक्रिया दिली आहे. झहीरने दक्षिण आफ्रिका मालिकेतील भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या सांगितली आहे. झहीर खानच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघ सामन्याच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करतो पण त्यानुसार शेवट करू शकत नाही. त्यामुळे झहीरने हीच संघाची सर्वात मोठी समस्या असल्याचे म्हंटले आहे. तो म्हणाला की, दोन्ही टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघ आधी वर्चस्व गाजवताना दिसला. पण थोडे दडपण येताच संघ विखराला आणि पराभूत झाला. कटक येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाचा ४ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना दक्षिण आफ्रिकेने १९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेने आता पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

दबावाखाली भारतीय संघाची कामगिरी बिघडते

सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. यानंतर झहीर खानने संघाच्या एका मोठ्या कमकुवततेकडे लक्ष वेधले आहे. क्रिकबझवरील संभाषणात तो म्हणाला की, “हेनरिक क्लासेन आणि टेम्बा बावुमा यांनी भागीदारी केली तेव्हा भारतीय संघाचा आत्मविश्वास खचलेला पाहायला मिळत होता आणि हे मैदानात स्पष्ट दिसत होते. या गोष्टींमध्ये संघाला सुधारणा कराव्या लागतील. खास करून प्रशिक्षक राहुल द्रविडला त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तिसर्‍या टी-२० मध्ये अजून जास्त वेळ शिल्लक नाही. त्यामुळे भारतीय संघाला लवकरात लवकर पुन्हा तयारी करावी लागणार आहे. त्यांना ४० षटकांपर्यंत सातत्याने स्पर्धा कशी करता येईल याची खात्री करावी लागेल. भारतीय संघाला सामन्याचा व्यवस्थित शेवट करता येत नाही आणि ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.”

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला आणि दुसर्‍या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत २-० अशी आघाडी घेतली आहे. या दोन्ही संघातील तिसरा सामना १४ जूनला विशाखापट्टणम येथे खेळायला जाणार आहे. दोन्ही सामन्यात पराभूत झालेला भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. मागील दोन सामने पाहता भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!