मुंबई : यंदाच्या आयपीएल हंगामात फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू स्पर्धेत उतरला होता. संघाने क्वालिफायर २ पर्यंत मजल मारली. या सामन्यात राजस्थान संघाकडून पराभव पत्करावा लागला. बंगळूरू सामने गमावला असला तरी जेव्हा आयपीएल २०२२ आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा विचार केला जातो तेव्हा याच संघातील रजत पाटीदार चे नाव समोर येते. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा मानतो की रजत पाटीदार हा आयपीएल २०२२ चा सर्वात सरप्राईज खेळाडू होता. त्याने खेळलेली खेळी त्याच्या नजरेत ‘नॉक ऑफ द सीझन’ असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला की,’त्याची खेळी अशा वेळी आली जेव्हा संघ दबावाखाली होता आणि संघाला विजयाची नितांत गरज होती.’
आयपीएल २०२२ च्या लिलावात न विकल्या गेलेल्या पाटीदारला दुखापतग्रस्त खेळाडूचा बदली खेळाडू म्हणून जागा मिळाली होती. पण एलिमिनेटर सामन्यात त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. त्याने लखनऊविरुद्ध ५४ चेंडूत ११२ धावांची धडाकेबाज खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून दिला. क्वालिफायर २ मध्ये जेव्हा संघाला राजस्थानविरुद्ध त्याच्याकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची गरज होती. तेव्हाही त्याने संघाला सावरत सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले होते. मात्र त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे फलंदाजांनी सजलेल्या राजस्थानसमोर संघाला केवळ १५७ धावाच करता आल्या.
या सामन्यातही आरसीबीकडून रजत पाटीदार वगळता एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाहीत. खेळपट्टी बाकीच्या फलंदाजांसाठी अवघड वाटत असताना त्या सामन्यात पाटीदारने ४२ चेंडूत ५८ धावा केल्या होत्या. मात्र त्याची खेळी त्याच्या संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी पुरेशी ठरली नव्हती. या सामन्यानंतर संघाचा प्रवास क्वालिफायर २ मध्ये संपला. या आयपीएलमधील पाटीदारच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ७ सामन्यात १५२.७५ च्या स्ट्राइक रेटने ५५.५० च्या सरासरीने ३३३ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

