Share

“हनुमान सुद्धा डोक्याला हात मारून घेत असेल” ; महंतांच्या राड्यावर अजित पवारांची टोलेबाजी

Published On: 

पुणे : आतापर्यंत महाराष्ट्रात हनुमान चालीसा आणि लाऊडस्पीकरवरुन वाद सुरू होता. हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही तोच आता हनुमानाच्या जन्मस्थानावरून वाद सुरू झाला आहे. हनुमान जन्मस्थानासंदर्भात मंगळवारी नाशिकमध्ये धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर, कर्नाटक, सोलापूर येथून सुमारे 20-25 साधू-संत धर्मसंसदेत उपस्थित होते. या संसदेत साधू-संतांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले. यावेळी जोरदार राडा देखील झाला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये महंतांच्या राड्यावर टोलेबाजी केली. ते म्हणाले, “साधू, महंतांचा स्वभाव हा शांत असतो, महंतांनी गप्प बसावं तर हे एकमेकांना ते माइक घेऊन मारत आहेत अन् आपण त्यांना महंत, महाराज म्हणतो. यांचा राडा पाहून हनुमान सुद्धा डोक्याला हात मारून घेत असेल अरे हा काय प्रकार आहे.”

नेमकं काय घडलं होते?

नाशिक येथील सभेत हनुमान जन्मस्थळावरून झालेल्या वादात तुलसीदास महाराज यांनी सरस्वती गोविंदगिरी महाराज यांना मारण्यासाठी माईक उचलला, त्यामुळे सभेत गदारोळ झाला होता. हनुमानजींचे जन्मस्थान अंजनेरी आहे की किष्कंध यावरून देशात सध्या वाद सुरू आहे. किष्कंधाचे मठाधिपती सरस्वती गोविंदगिरी महाराज यांनी हनुमानाच्या जन्मभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नाशिकमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते.

वास्तविक ही धर्मसंसद हनुमानाच्या जन्मस्थानासंदर्भात बोलावण्यात आली होती. हनुमानजींचा जन्म कुठे झाला हे ठरवायचे होते. ऋषी बोलत असताना नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास आणि कर्नाटकातील किष्किंधाचे महंत यांच्यात भांडण झाले. मात्र, उर्वरित संतांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोघांनाही समजावले. यानंतर धर्म संसद रद्द करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!