🕒 1 min read
नवी दिल्ली : हेंड बसतामी या 28 वर्षीय महिलेने पोलिसांवर धक्कादायक आरोप केला आहे. रेस्टॉरंटचं बिल चुकवल्याच्या आरोपाखाली संबंधित महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मात्र, या महिलेने पोलिसांवर चक्क बलात्काराचा आरोप केला आहे. संबंधित महिलेने मी सुंदर दिसत असल्याने पोलीस यांच्याकडून अटक करण्यात आल्याचा अजब दावा. तसेच अटक केल्यानंतर पोलिसांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप या महिलेने केला आहे.
हेंड बसतामी हिचा पोलीस यांच्यावर आरोपः
बसतामी ही हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करत असून रीडवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका हॉटेलचं बिल न दिल्याचा आरोप आहे. तिने तिथल्या चिली नावाच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. मात्र, तिथे तिने बिल भरलं नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने पोलिसांनी बोलावलं आणि पोलिसांनी तिला अटक केली.
यावेळी अधिकार्यांशी भांडण करत तिचा छळ केला जात असल्याचं तिने म्हटलं आहे. पोलिसांनी आजपर्यंत तिच्यासारखी सुंदर कोणीही पाहिले नाही, इतकंच नाही तर पोलिसांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिने केला आहे.
दरम्यान, या महिलेने पोलिसांवर थुंकण्याची धमकी दिली आणि आरोप केला की, पोलिसांनी तिच्यासोबत चुकीचा व्यवहार केला. याप्रकणी क्लार्क काउंटी डिटेन्शन सेंटरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला ८० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात येण्याची शक्यता आहे. तिला येत्या २७ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्याः
- Kishori Pednekar | “मी तुमच्यासारखे मुंबईत छक्के-पंजे खेळले नाही” ; भाजपच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार
- Aurangabad Police | औरंगाबाद पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! ‘असा’ घेतला बिंधास्त काव्याचा शोध
- Rupali Patil | “गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील थोडक्यात जिंकले, यावेळी…” ; रुपाली पाटलांचा इशारा
- Britian New King | चार्ल्स-तृतीयची ब्रिटनचा नवा राजा म्हणून घोषणा तर पत्नीला क्वीन कॉन्सोर्ट ही पदवी
- Shivsena | मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर वरुण सरदेसाईंनी साधला निशाणा म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
