🕒 1 min read
मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई महानगरपालिकांच्या निवडणूकांच वारं घुमू लागलं आहे. सर्व पक्ष निवडणुकींच्या तयारीला लागले आहेत. यातच गणेशोत्सवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेव्हापासून भाजप, मनसे आणि शिंदे गट यांच्या युतीच्या चर्चा होत आहेत. अशातच शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी भाजप, मनसे आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
वरुण सरदेसाई यांचे वक्तव्य-
गेल्या 30 वर्षात शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक आव्हानं पेलली आहेत. यंदाचेही आव्हान आम्ही पेलू. समोर कुणीही येवो, कुणाचीही युती व्हावी. 3 पक्ष काय 30 पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत, असं म्हणत वरुण सरदेसाईनी यांनी तिन्ही पक्षांना चांगलंच फटकारलं आहे. वरूण सरदेसाई शिवसेनेच्या निर्धार अभियानाची सुरुवात करण्यासाठी वरुण सरदेसाई सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
पुढे ते असंही म्हणाले की, वारंवार निवडणुका पुढे ढकलण्यापेक्षा निवडणुका जाहीर करा. मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जायला शिवसेना तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही केवळ निवडणूक लढणार नाही तर जिंकणार आहोत.
दरम्यान, शिंदे गट आणि मनसे पक्षाच्या युतीबाबत मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना विचारण्यात आले होते. त्यावेळी शिंदे गटाबरोबर युती करायची की नाही याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bindass Kavya Missing | औरंगाबाद येथील प्रसिद्ध युट्युबर ‘बिनधास्त काव्या’ बेपत्ता ; आई-वडिलांची आर्त हाक
- Amravati | “लव्ह जिहाद पहिल्यांदाच झाले आहे?, याआधी कुठे गेली होती नवणीत राणा”
- Shinde vs Thackeray | एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना देणार होते मोठा झटका! शिवसेना खासदाराच्या मुलाने केले ऑपरेशन फेल
- Navneet Rana | “नवनीत राणा तुला मी आता सोडणार नाही” ; पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा इशारा
- Congress vs Bjp | राहुल गांधींनी घातला 41 हजारांचा टी-शर्ट! भाजपच्या आरोपांना काँग्रेसचं उत्तर! म्हणाले, “मोदींचा सूट…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
