पुणे : शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तिच्याच नात्यातील तरुणाने तिला जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला असल्याचं समोर आलं आहे. आरोपीचं नाव विशाल गायकवाड असं आहे. शिक्रापूर पोलिसांनी या नराधमास अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील भाजप पक्षाच्या एका नेत्याच्या मालकीच्या शेती आणि फार्महाऊसवर घडला असल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणाबाबत तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप केले आहेत.
भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर पिडीतेचा बलात्कारः
पुण्यातील एका भाजप नेत्याच्या मालकीच्या शेती आणि फार्महाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आई-वडील वास्तव्य आणि कामासाठी आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. अशातच पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर त्यांच्याच नात्यातील या नराधमाने या फार्म हाऊसच्या मागच्या मजूर खोल्यांच्या मागे या अल्पवयीन मुलीला नेत जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला.
तृप्ती देसाई यांचा आरोपः
हा फार्महाऊस भाजपाच्या नेत्याचा असल्यामुळे त्याची चर्चा कुठे होऊ नये, यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी स्थानिकांनी शक्यता व्यक्त केली आहे, अशी माहिती तृप्ती देसाई यांनी दिली आहे. अशा अनेक तक्रारी आणि फोन मला आले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे, की या बारा वर्षीय मुलीला न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं जावं, तसेच संबंधित भाजपा नेत्याचा घटनेशी संबंध नसला तरी फार्म हाऊस त्यांच्या मालकीचे आहे. त्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Amit Thackeray | शिंदे गटाशी युती होणार का?, अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य म्हणाले…
- Kishori Pednekar | कंबोज तू असशील पैसेवाला, ते तुझ्या घरी, फालतूगिरी बंद कर! ; किशोरी पेडणेकर आक्रमक!
- Amravati | “नवनीत राणा किंवा त्यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची दादागिरी महाराष्ट्रात चालणार नाही”
- Bindass Kavya Missing | औरंगाबाद येथील प्रसिद्ध युट्युबर ‘बिनधास्त काव्या’ बेपत्ता ; आई-वडिलांची आर्त हाक
- Amravati | “लव्ह जिहाद पहिल्यांदाच झाले आहे?, याआधी कुठे गेली होती नवणीत राणा”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

