🕒 1 min read
मुंबई : दिल्ली महिला आयोग अध्यक्षाच्या एका ट्विटने खळबळ उडवली आहे. स्वाती मालीवाल यांनी ट्विटर वर एक ट्विट करून मोठा गौप्यस्फोट केला आहे. इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. मात्र या सोशल मीडियाचा जगात अनेक प्रकारे गैरवापर केला जात आहे.
अलिकडे सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी सहजपणे सेकंदात व्हायरल होत आहे. त्यामुळेच अश्लील फोटो, व्हिडिओ आणि गुन्हेगारीला देखील प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी जोरात वाढू लागले आहेत. स्वाती मालीवाल यांनी केलेल्या ट्वीटमध्ये तरुणी आणि महिलांच्या बलात्काराचे व्हिडिओ वीस रुपयांना ट्विटरवर विकले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या आरोपाबाबत ट्विटर इंडियाच्या पॉलिसी हेडला समन्स बजावला आहे. मंगळवारी ट्विट करत या प्रकाराचा खुलासा करण्यात आला आहे. सोमवारी मालीवाला यांनी विनयभंगाचा कसा खुल्या प्रचार केला जात असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, हजारो लोक लहान मुलांच्या बलात्काराचे व्हिडिओ शेअर करत असून गुप्तचर कॅमेरान द्वारे महिला आंघोळ करत असल्याचे व्हिडिओ देखील टाकले जात आहेत. ही कंपनी परदेशातील कायद्याचे पालन करते आणि भारतातील महिलांवरील अश्लीलता आणि बलात्काराकडे डोळे झाक करते, असं स्वातींनी त्यांच्या ट्विटरमध्ये म्हटलं आहे.
स्वाती मालीवाल यांनी एका पाठोपाठ एक असे अनेक ट्विट केले असून याबाबतचे फोटो देखील या ट्विटमध्ये शेअर करण्यात आले आहे.
पाहा ट्विटः
महत्वाच्या बातम्या :
- Weight Loss Tips | सीटॲप्स मुळे पोटाची चरबी निघून जाईल, पण ते करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा.
- Sushma Andhare | “रामदास कदम तर चिल्लर माणुस आहे, त्यांच्या विरोधात आता…”, सुषमा अंधारेंचं ओपन चॅलेंज
- महागाईचा तडाखा, दिवाळीपूर्वी महागणार महिंद्रा थार
- Ajit Pawar | “तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा, पण…”, रामदास कदमांवर अजित पवार संतापले
- Viral Monkey Video | माणसाची बॅग उघडून माकड चोरी करताना दिसले, व्हिडिओ पाहून हसू आवरेना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
