Share

Kishori Pednekar | “मी तुमच्यासारखे मुंबईत छक्के-पंजे खेळले नाही” ; भाजपच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :   याकूब मेमनच्या कबरीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुद्यावर भाजप नेत्यांनी शिवसेना पक्षाला टार्गेट केलं आहे. आता याकूब मेमनचा नातेवाईक असलेल्या रऊफ मेमनसोबत शिवसेनेच्या नेते आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैठक घेतल्याचा भाजपकडून दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडीओही भाजपने जारी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच याच पार्श्वभूमिवर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर पलटवार केला आहे.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

एका मध्यमवर्गीय महिलेलाही तुम्ही नाही सोडत. मी कामाने मोठी झाले. मी तुमच्यासारखे मुंबईत छक्के-पंजे खेळले नाही. मला माहिती नाही ते. माझ्या कामावर आक्षेप असेल तर मला सांगा. हे फोटो तर कुणीही काढतं, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. यासंदर्भातील व्हिडीओ किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या ट्विटर आकाऊटवरून शेअर केला आहे. त्यामध्ये त्या बोलताना दिसून येतं आहे.

तसेच किशोरी पेडणेकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगरसिंह कोश्यारी यांचा रऊफ मेमनसोबतचे फोटो दाखवत याला काय म्हणायचं? याला उत्तर द्या, असं किशोरी पडेणेकर यांनी म्हटलं आहे. पुढे त्या असंही म्हणाल्या की, मला वाटतं की हे फार चुकीचं आहे. ज्याच्याशी उद्धव ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही, तिथे संबंध जोडत आहेत.

दरम्यान, भाजपने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये किशोरी पेडणेकर आणि रउफ मेमन हे एका बैठकीत असल्याचं दिसून येतं आहे. त्याचबरोबर ही बैठक बडा कब्रिस्तानमध्ये झाली असल्याचं भाजप बोलतं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!