Share

Rupali Patil | “गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील थोडक्यात जिंकले, यावेळी…” ; रुपाली पाटलांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात निवडणुकांचे जोरात वारे वाहू लागले आहे. निवडणुकीआधीच राजकीय नेते अनेक जागांवर आपला दावा सांगत आहेत. दरम्यान भाजपने बारामती लोकसभा मतदार संघावर विशेष लक्ष द्यायला सुरवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुगलबंदी सुरू आहे. गेल्या वेळी सुप्रिया सुळे थोडक्यात वाचल्या. यावेळी परमेश्वरही त्यांना वाचवू शकणार नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं होतं. दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

रुपाली पाटील म्हणाल्या, “गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दादा थोडक्यात जिंकले , यावेळी परमेश्वरही त्यांना वाचवू शकणार नाही.” अजित पवार यांनी देखील यावर स्पष्टीकरण दिले होते. बारामतीत भाजपाकडून ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, त्याचा काही फरक पडणार नाही. सुप्रिया सुळे यांचं काम बोलतं, त्यामुळे त्या निवडून येतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता.

https://www.facebook.com/Rupalispeak/posts/pfbid0w1VAitzBwWZ7nkNJqwVALMksWSUGWmQJF7t5NK43QwFsQGFkY3ATjPdcAshDLzwal

बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल-

बारामतीला धडका मारून काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा आधी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा. गेल्यावेळी माझ्याविरोधात ज्यांनी निवडणुका लढवल्या त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, मी रोज सकाळी 6 ला कामाला सुरुवात करतो. मी माझ्या मतदारसंघात लाखाच्या मताधिक्याने विजयी झालो आहे. आपली ताकद मोठी आहे असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांना इशारा दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!