🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद येथील प्रसिद्ध यूट्यूबर बिंधास्त काव्या घरातून बेपत्ता झाली होती. आभ्यासावरुन तिचे वडील तिला रागवले होते. याच रागातून काव्या काल घरुन निघून गेली होती. अशातच औरंगाबाद पोलीस यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली असून या मुलीचा शोध घेण्यात त्यांनी यश मिळवलं आहे.
औरंगाबाद पोलीस यांची कौतुकास्पद कामगिरीः
मा. पोलीस आयुक्त डॅा. निखिल गुप्ता सरांचे व्यक्तिगत पाठपुरावा केलेने Railway Protection Force ( RPF) च्या मदतीने अल्पवयीन मुलगी शोधण्यात औरंगाबाद पोलिसांनी यश मिळवलं. औरंगाबाद शहर पोलीस दल हे रात्रभर गणेश विसर्जन बंदोबस्त करून थकले असताना, पोलीस स्टेशन छावणी हद्दीत रहाणारी काव्या ही अचानक गायब झाली होती. काव्या गायब झालेने तिच्या पालकांनी पोलीसांना माहीती दिली. तसेच तात्काळ अपहरण चा गुन्हा दाखल करून औरंगाबाद पोलिसांनी तिचा शोध सुरू केला.
मा. पोलीस आयुक्त डॅा. निखिल गुप्ता सरांनी स्थानिक पोलीस , सायबर , गुन्हे शाखा यांना सदर मुलगी तात्काळ शोधण्याचा आदेश दिला.
प्रत्येक १ तासात अहवाल देणेचा देखील आदेश दिण्यात आला. अल्पवयीन मुलीचे पालक यांनी दिलेले माहीती व सायबर सेल ने अल्पवयीन मुलीच technical पध्दतीने शोधलेली वैयक्तिक माहीती यावरून सदर अल्पवयीन मुलगी ही महाराष्ट्र सोडुन मध्यप्रदेशला खुप वेगाने जात असल्याचे दिसुन आले. यावरुन ती कदाचित train ने प्रवास करत असावा असा अंदाज काडला व तो चेक केला असता तर तो मार्ग हा भारतातीलच सर्वात busy असणाऱ्या railway track वरील होता.
संबंधित मार्गावरुन शेकडोंनी train येत जात असतात . यातुन पहीली ट्रेन शोधणं व त्या train मधील बोगी शोधने व त्यातुंन एकादी व्यक्ती शोधने हे एक आव्हान होते. मा. पोलीस आयुक्त सो यांनी व्यक्तिगत लक्ष घालुन रात्रभर जागरण झालले अस्ताना अख्ख औरंगाबाद शहर पोलीस दल कामाला लावलं. स्वतः RPF चे ( Railway protection force) .. GRP ( महाराष्ट्र रेल्वे पोलीस दल ), रेल्वे विभागातले वरिष्ठ आधिकारी यांचे संपर्क करून , अल्पवयीन मुलीचे फोटो , तिची माहीती व औरंगाबाद पोलीसांनी ती कुठे असावी व कुठे जात असावी ही केलेले अभ्यासपुरवक विश्लेषण करून कळवले असता सदर मुलीस शोधायला RPF ला यश मिळालं.
दरम्यान, काव्या ही रेलवेन्न् ने you tube वर झालेला तिच्या मित्राकडे चालली होती. संबंधित तरुण हा लखनऊ येथील रहिवासी आहे. मात्र, पालकांना कल्पना न देतां परस्पर निघाली असून खुशीनगर एक्सप्रेस गाडी मध्ये असल्याचं व ती गाडी सध्या खांडवा रेल्वे स्टेशन पास करून पुढे गेली असल्याचे समजातच आरपीएफ च्या मदतीने सदर मुलीला ताब्यात घेण्यात आलं. यानंतरच औरंगाबाद शहर पोलीसांना दिलासा मिळाला .अल्पवयीन मुलीच्या पालकांनी , मा. पोलीस आयुक्त सरांच्या व्यक्तिगत प्रयत्नांमुळेच आमची मुलगी शोधण्यात यश मिळालं असुन सरांचे मनःपुर्वक आभार व्यक्त केले व छावणी व सायबर पोलीसांचे केलेली शोध मोहीम चे कारवाई कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Rupali Patil | “गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील थोडक्यात जिंकले, यावेळी…” ; रुपाली पाटलांचा इशारा
- Britian New King | चार्ल्स-तृतीयची ब्रिटनचा नवा राजा म्हणून घोषणा तर पत्नीला क्वीन कॉन्सोर्ट ही पदवी
- Shivsena | मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर वरुण सरदेसाईंनी साधला निशाणा म्हणाले…
- Bindass Kavya Found : अखेर औरंगाबादची यूट्यूबर ‘बिनधास्त काव्या’ इटारसीमध्ये सापडली
- Trupti Desai | भाजप नेत्याच्या फार्महाऊसवर तरुणीवर **, तृप्ती देसाई यांचा धक्कादायक आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
