Share

Gulabrao Patil | तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेनेत- गुलाबराव पाटील

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे? गोधडीत पण नव्हता. आम्ही तेव्हाही शिवसेनेत होतो. याला काय अधिकार आमच्यावर टीका करण्याचा?, अशा शब्दांत गुलाबराव पाटलांनी निशाणा साधला.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर टीका होत आहे. गेल्या 35 वर्षात आम्ही काय केले ते आम्हाला माहिती आहे. झेंडा लावणारे आम्ही आहोत. मार खाणारे आम्ही आहोत. तडीपार होणारे आम्ही, जेलमध्ये जाणारे आम्ही, मात्र ते 32 वर्षाचं पोरगं आदित्य ठाकरे आमच्यावर टीका करतं. तू गोधडीत पण नव्हता, तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहोत”, असा घणाघात गुलाबराव पाटलांनी केला. तुम्ही इस्टेटचे वारसदार होऊ शकतात. मात्र विचारांचे वारसदार होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार हा गुलाबराव पाटील आहे. कोण आदित्य ठाकरे? यांना काय अधिकार आहे आमच्यावर टीका करण्याचा?, असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!