Share

Dhananjay Munde | “बाह्य संस्थेमार्फत नेमलेल्या बस चालकांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अन्यथा…”, धनंजय मुंडे

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या घटनेमुळे मोठा धुमाकूळ देखील उडाला होता. या काळात राज्य परिवहन महामंडळाने बस सुरू राहण्यासाठी बाह्य संस्थेमार्फत 800 कंत्राटी निवडल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू रहावी यासाठी बाह्य संस्थेमार्फत 800 कंत्राटी चालक नेमले होते, मात्र आता त्या सर्वांना काढून टाकण्यात येत आहे. ज्या लोकांनी एसटी बंद होऊ नये म्हणून दिवसरात्र काम केले, आता त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य शासनाने त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं अन्यथा कठीण काळात सेवा दिलेल्या या लोकांवर उपासमारीची वेळ येईल, असा इशारा देखील धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे दिला आहे. या ट्वीटमध्ये मुंडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ट्याग केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!