Share

Amit Shaha | “उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला, आता आपण…”, अमित शहांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपचे लक्ष्य 150 जागा जिंकण्याचं आहे, अशी घोषणा केली. शहांनी आज लालबागच्या राज्याचे दर्शन देखील घेतलं. यानंतर त्यांनी भाजप कार्यकर्यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील सडकडून टीका केली आहे.

अमित शहा यांचं कार्यकर्तांना आवाहनः

मुंबईच्या दौऱ्यावर असणाऱ्या शहा यांनी कार्यकर्त्यांना भाषण देत असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला असल्याचं म्हटलं आहे. केवळ दोन जागांसाठी ठाकरेंनी 2014 मध्ये युती तोडली असं सांगतानाच मोदी आणि फडणवीस यांच्या नावाने मत मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप शहा यांनी केला.

उद्धव ठाकरे यांना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहेः

उद्धव ठाकरे यांना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे, आवाहन शहांनी कार्यकर्तांना दिलं आहे. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा देखील देण्यात यावी त्यामुळे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जमिनीवर उतरून काम केलं पाहिजे, असं आवाहन शहा यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर दिलं आहे.

दरम्यान, राजकारणात काहीही सहन करा, मात्र धोका सहन करायचा नाही, असा थेट संदेश अमित शहा यांनी आपल्या भाषणामधून दिला आहे. तसेच जी धोका देतात त्यांना शिक्षा देखील दिली पाहिजे आणि यासाठी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरावं अशी अपेक्षा देखील शहांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातले हिंदू विरोधी राजकारण आपल्याला संपवायचं आहे, असं शहा म्हणाले.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!