Share

Devendra Fadanvis | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य म्हणाले…

Published On: 

मुंबई :  महाराष्ट्र राज्यातील सध्याचंं राजकीय वातावरण खूप गढुळ झालं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकही तोंडावर आल्या असल्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत असल्याचं दिसून येतं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुक संदर्भात एक वक्तव्य केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य-

पूर्ण देशाला माहिती आहे की चाणक्य कोण आहे? आता मुंबई महानगरपालिका निवडणूक अशी लढा की जणू ही शेवटची निवडणूक आहे. काहीही करून मुंबई पालिकेवर भाजपाचा महापौर बसलाच पाहिजे, असं भाजप पदाधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आज मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

भाजप नेते अशिष शेलार यांनीही मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 135 जागा निवडून आणणे हे मिशन असणार आहे.

दरम्यान,अमित शहा मुंबईमध्ये दाखल झाले असून, त्यांच्या दोन बैठका होणार आहेत. पहिली बैठक कोअर कमिटीची बैठक असणार आहे. ही बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ या निवासस्थानी पार पडत आहे.या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, आणि मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!