Share

Shivsena | “भाजपकडे नेहमी मिशन्स असतात पण मूळ समस्यांपासून ते मिसिंग असतात”, शिवसेनेकडून पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौरावर आहेत. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये भाष्य करत असताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच दोन्ही पक्षांनी मिळून 150 जागा जिंकण्याचं टार्गेट देखील दिलं आहे. याच टीकेवर शिवसेनेने म्हणजेच शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पलटवार केला आहे.

अरविंद सावंत यांचं प्रत्युत्तरः

भाजपकडे नेहमीच कुठली ना कुठले मिशन असतात. मात्र, जनतेच्या मूळ समस्यांपासून ते मिसिंग असतात, अशी टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होईल, असेही त्यांनी यावेळी ठासून म्हटलं आहे.

आज काय लोटस मिशन, उद्या काय दुसरे मिशन, पण जे खरे प्रश्न आहेत त्यापासून ते मिसिंग असतात, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. अनेक प्रश्न त्यातही जनतेच्या प्रश्नांपासून भाजपा दूर आहे, मराठी माणसांच्या अस्मितेपासून भाजप दूर आहे, मुंबई महापालिकेवर असलेले शिवसेनेचा भगवा झेंडा कोणीही हलवू शकत नाही, मुंबईतील जाती-पाती सर्वधर्मीय माणसे यांना मुंबईमध्ये शांतता हवी, मुंबई शहरात शिवसेनेने निर्माण केलेली व्यवस्था, दिलेल्या सुविधा हे मतदार विसरणार नाही, असेही सावंतांनी स्पष्ट केलं आहे.  मुंबईकरांना 24 तास पिण्याचे पाणी देण्याचं काम देखील शिवसेनेने केलं असल्याची आठवण सावंतांनी करून दिली.

अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला होता निशाणाः

दरम्यान, केवळ दोन जागांसाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका देऊन विश्वासघात केल्या असल्याचा आरोप शहा यांनी त्यांच्या भाषणामधून केला होता. मात्र, शिवसेनकडून या टीकेवर लगेचंच प्रतिक्रीया आली आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!