🕒 1 min read
पटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी खोचक टीका केली होती. विजयवर्गी यांनी नितीश कुमार यांची तुलना बॉयफ्रेंड बदलणाऱ्या महिलांसोबत केली होती. परंतू त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवर विजयवर्गीय यांचा व्हिडिओ शेअर करत व्हिडिओला ‘महिलांचा आदर दाखवणारे भाजप सरचिटणीसांचं उदाहरण’, असं कॅप्शनही दिलं. अशातच यावर कैलाश विजयवर्गी यांनी केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
महिला आमच्यासाठी पवित्र आहेत-
मी नारी शक्तीचा सन्मान करतो. हे वादग्रस्त वक्तव्य माझं नाही, ते माझ्या एका विदेशी मित्राचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी काल म्हणजेच शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी पत्रकारांशी बोलताना हे स्पष्टिकरण दिलं आहे. त्याचबरोबर जिथे महिला शक्तीचा प्रश्न येतो, महिला आमच्यासाठी पवित्र आहेत, त्यामुळे आम्ही सर्व भारतीय स्त्रियांचा आदर करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
जर कोणतीही व्यक्ती मी केलेल्या वक्तव्याकडे वेगळ्या नजरेने पाहत असेल किंवा माझं सगळं विधान जाणून घेतल्यानंतरही त्यावर सवाल उपस्थित करत असेल. तर याचा अर्थ ती व्यक्ती अज्ञानी असल्याचं कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते कैलाश विजयवर्गीय?
जेव्हा मी काही दिवस परदेशात होतो, तेव्हा इथल्या स्त्रिया कधीही बॉयफ्रेंड बदलत असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. अगदी त्याचप्रमाणे बिहारचे मुख्यमंत्रीही तसेच असून कोणाचा हात धरतात तर कोणाचा हात सोडतात हेच कळत नाही, असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पद भरती मध्ये ‘इतक्या’ पदांची झाली वाढ
- Delhi । दिल्लीत घडामोडींना वेग; सिसोदिया यांच्यावरील छापेमारीननंतर तात्काळ १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
- Manish Sisodia । “भ्रष्टाचार केलेला नाही, त्यामुळे…”; 14 तासांच्या तपासणीनंतर मनीष सिसोदियांची मोठी प्रतिक्रिया
- Uddhav Thackrey | “सरकारने निष्पाप जीवांचा बळी घेतला, फडणवीस आता…”, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
- Uday Samant । हल्ला झाला त्याच ठिकणी घेणार सभा, दम असेल तर धक्का लावा; सामंतांचे शिवसेनेला आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
