🕒 1 min read
दिल्ली : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यात रिपाइंला मंत्रिपद देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. आठवलेंपाठोपाठ आता राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर यांनीही भाजपकडे मंत्रिपदाची मागणी केली आहे. भाजपने मित्र पक्षांना सत्तेत वाटा दिला पाहिजे. आम्हाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक महामंडळ दिलं पाहिजे, अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे.
त्यामुळे शिंदे-फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतून 40 आमदारांनी बंड केलं आहे. तसेच दहा अपक्ष आमदारांनीही शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यात काहीजणांनी तर मंत्रिपदावरही पाणी सोडलं आहे. त्यामुळे या सर्वांना मंत्रिमंडळात सामावून घेताना मित्र पक्षालाही मंत्रिमंडळात भाजप कसे स्थान देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Lal Singh Chaddha | सुपरस्टार नागार्जुनने केले ‘लाल सिंग चड्ढा’चे कौतुक; आमिरसोबतचा फोटो शेयर करत म्हणाला…
- Maharashtra Cabinet Expansion | शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? १२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता
- Sachin Sawant | एमआयएम आणि भाजपची विचारधारा एकच – सचिन सावंत
- Patra Chawl Case | संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात! १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- kishori pednekar on TET Scam | “सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत. मग आता काय बोलायचं?”; टीईटी घोटाळ्यावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
