Share

Patra Chawl Case | संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात! १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कारागृहात संजय राऊत यांना घरचे जेवण आणि औषधे दिली जाऊ शकतात. संजय राऊत आज जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचे वृत्त आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांना आता आर्थर रोड कारागृहात नेण्यात येणार आहे.

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचे अनोळखी व्यक्तीशी व्यवहारिक संबंध आहेत. वर्षा राऊत यांच्या खात्यातून अनोळखी व्यक्तीशी मोठ्या रकमेची देवाणघेवाण करण्यात आली असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे ईडीने म्हटले होते. तसेच संजय राऊत यांनी 10 प्लॉट खरेदी करण्यासाठी 3 कोटी रुपये रोख दिल्याची माहिती ईडी तपासात समोर आली होती.

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंटमन’-

पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यातून मिळालेले पैसे अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वळवण्यात आले आणि प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना रोख रक्कमही दिली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या रिमांड अहवालात यापूर्वी म्हटले होते. संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून दरमहा लाखो रुपये मिळत असत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवीण राऊत यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे 1.06 कोटी रुपये वळवले. यासोबतच प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे ‘फ्रंटमन’ असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे.

वर्षा राऊत यांच्या पत्नीची 9 तास चौकशी –

ईडीने शनिवारी वर्षा राऊत यांची या प्रकरणासंदर्भात नऊ तासांहून अधिक वेळ चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवला.संजय राऊत हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. या प्रकरणी ईडीने राज्यसभा सदस्य संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती आणि गुरुवारी स्थानिक न्यायालयाने त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पुढील कोठडीत पाठवले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!