🕒 1 min read
मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी त्यांचे शासकीय निवासस्थान नंदनवन गाठले. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या मंगळवारी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. १५ ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले होते. दरम्यान, आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर या संदर्भात दोन्ही नेत्यांची ही भेट असल्याचे समजते. उद्या १२ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच दिलेल्या निवेदनात १०-११ ऑगस्ट दरम्यान शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असे म्हटले होते. त्याचवेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ ऑगस्टपूर्वी किमान १२ मंत्र्यांचा समावेश करून मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकतात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाचे गृहखाते सांभाळतील अशीही बातमी आहे. उद्या राजभवनात सकाळी १२ वाजता हा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटणार-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. राजभवनात देखील तयारी सुरु आहे. भाजपकडून आत्तापर्यंत चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, यांना निरोप देण्यात आले आहेत. तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, संजय शिरसाठ, संदिपान भुमरे यांना निरोप देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात सध्या द्विसदस्यीय मंत्रिमंडळ-
शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ३० जून रोजी शिंदे आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून दोघेही द्विसदस्यीय मंत्रिमंडळ म्हणून काम पाहत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते सातत्याने हल्लाबोल करत आहेत. यावर लवकरच आणखी मंत्र्यांचा समावेश केला जाईल. सरकारच्या कामावर कोणत्याही प्रकारे परिणाम झालेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू-
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करावे, तसेच त्यांना विधानसभेपासून दूर ठेवावे आणि अपात्रतेची कारवाई होईपर्यंत सभागृहाच्या कामकाजाला उपस्थित राहू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. पूर्ण झाले आहेत.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लांबणीवर पडत असल्याचे बोलले जात होते. मंत्र्यांची संख्या आणि खात्यांबाबत भाजप आणि शिंदे गटात एकमत झाल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sachin Sawant | एमआयएम आणि भाजपची विचारधारा एकच – सचिन सावंत
- Patra Chawl Case | संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात! १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- kishori pednekar on TET Scam | “सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत. मग आता काय बोलायचं?”; टीईटी घोटाळ्यावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
- Pruthviraj Chavan on TET Scam | “आता अब्दुल सत्तार यांनाच शिक्षण मंत्री केले जाईल”; पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्तार यांना टोला
- सरकार तुपाशी कर्मचारी उपाशी! ग्रामविकास मंत्रालयाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना ४ महिने पगारच नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

