🕒 1 min read
मुंबई : टीईटी घोटाळा म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हि यादी परीक्षा परिषदेकडून जारी करण्यात आली असून यामध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावाचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणात आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आली आहेत. त्यावरून आता विविध राजकीय पक्षांचे नेते सत्तारांवर निशाणा साधत आहेत. त्यातच आता मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही प्रतिक्रिया देत सत्तारांवर टीका केली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता पेडणेकर म्हणाल्या, “आता काय सांगायचं अन् काय बोलायचं? सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत. या लोकांनी संपूर्ण जनतेची फसवणूक केली आहे. काय बोलणार आता या सगळ्यांना? सरकार काय करतंय? केंद्र सरकार काय करतंय ते कळेल? आमच्या नेत्यांना ईडी काडी लावून आत पाठवलं गेलं. आता यांना सरकार काय करणार?”
चंद्रकांत खैरेंचीही टीका
“तुमचंच सरकार आहे. तुम्ही चौकश्या लावा ना. अब्दुल सत्तार यांच्या मुली जर दोषी नसतील तर त्यांनी सीआयडी चौकशी लावावी. जर त्यांची काही चूक नाही तर हा घोटाळा कुणी केला त्याचा शोध लावा आणि फासावर लटकवा. कोणत्या संस्थेच्या लोकांनी या घोटाळेबाजांना मदत केली? तसेच अब्दुल सत्तार यांच्या बऱ्याच प्रकरणांची फाईल माझ्याकडे आहे. ते आमचे जुने मित्र आहेत त्यामुळे मी त्यांना एवढच सांगेल कि तुम्ही उगीच बडबड करू नका. शांत राहा”, असा सल्ला खैरे यांनी सत्तारांना दिला आहे.
सत्तार यांचे स्पष्टीकरण
माझ्या मुलींनी परीक्षा दिली होती मात्र त्या पात्रच झाल्या नाहीत मग त्यांची नावं या यादीच आलीच कशी? माझ्या मुली या माझ्याच संस्थेत २०१७ साली नोकरीला लागल्या आहेत. त्यानंतर त्यांनी हि परीक्षा दिली होती मात्र त्यात त्या दोघीही अपात्र ठरल्या. त्याची प्रमाणपत्र देखील माझ्याकडे आहेत. त्याची कॉपी कुणाला हवी असल्यास मी देऊ शकतो. माहितीच्या अधिकाराखाली शिक्षण खात्यातील कोणतीही माहिती कुणीही मिळवू शकतो. त्यामुळे जर माझ्या मुली त्यात दोषी आढळल्या तर कारवाई करावी, पण जर त्यांची यात काही चूक नसेल तर मात्र ज्यांनी हा बदनामीचा कट रचला आहे त्यांना फासावर लटकवलं पाहिजे, अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Pruthviraj Chavan on TET Scam | “आता अब्दुल सत्तार यांनाच शिक्षण मंत्री केले जाईल”; पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्तार यांना टोला
- सरकार तुपाशी कर्मचारी उपाशी! ग्रामविकास मंत्रालयाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना ४ महिने पगारच नाही
- Kishori Pednekar | दादर शिवाजी पार्क मधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले
- TET Scam | “…तर त्यांना फासावर लटकवा”; टीईटी प्रकरणावर अब्दुल सत्तार संतप्त
- MNS on Eknath Shinde | “तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे…” ; मनसेची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

