Share

Lal Singh Chaddha | सुपरस्टार नागार्जुनने केले ‘लाल सिंग चड्ढा’चे कौतुक; आमिरसोबतचा फोटो शेयर करत म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : साऊथचा सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी याने नुकतेच आमिर खान याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याने आमिरसोबतचा एक फोटो शेअर करताना या चित्रपटाचे वर्णन ‘ताज्या हवेत श्वास घेतल्यासारखे वाटले’, असे केले आहे. नागार्जुनचा मुलगा म्हणजेच साऊथचा आणखी एक सुपरस्टार असलेला नागा चैतन्य हा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

नागार्जुनने लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे कौतुक करत लिहले आहे कि, “हा चित्रपट तुम्हाला हसवतो, रडवतो आणि विचार करायला लावतो. या चित्रपटात एक साधा संदेश देण्यात आहे की प्रेम आणि निरागसता यामुळे तुम्ही कशावरही विजय मिळवू शकता. नागा चैतन्यला एक चांगला अभिनेता म्हणून मोठे होताना पाहून खूप छान वाटले. दिग्दर्शक अद्वैत चंदन, लेखन अतुल कुलकर्णी आणि संपूर्ण टीमने आम्हाला आनंदित केले आहे.”

काय म्हणाला नागा चैतन्य?
अभिनेता नागा चैतन्य नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाबद्दल बोलताना, म्हणाला, “जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर मिळाली, तेव्हा मी सर्वात आधी आमिर सरांशी भाषेच्या अडथळ्याबद्दल चर्चा केली. पण आमिर सर याबद्दल अगदी निवांत होते कारण चित्रपटात मला एका दक्षिण भारतीय मुलाची भूमिका साकारायची होती. एक दाक्षिणात्य मुलगा जो उत्तरेला जाऊन आपला प्रवास सुरू करतो, त्याची ही भूमिका आहे. त्यामुळे त्यांना मी जसा आहे तसाच हवा होतो.”

आमिरचे पुनरागमन
अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केलेला ‘लाल सिंग चड्ढा ‘हा चित्रपट टॉम हँक्स स्टारर हॉलीवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटातील आमिरची व्यक्तिरेखा लहानपणापासून ते वृद्धापकाळापर्यंत दाखवण्यात आली आहे. चैतन्य आर्मीमध्ये आमिरच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. तर करिनाने आमिरच्या बालपणीच्या प्रेमिकेची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री मोना सिंग आमिरच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून तीन वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!