Share

IND vs ENG : बुमराह भारताचा ३६वा कसोटी कर्णधार; पहिला मान कुणाला मिळाला होता? जाणून घ्या!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारपासून बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध एकमेव पूर्वनियोजित कसोटी सामना खेळणार आहे. सामन्याच्या काही दिवस अगोदर नियमित कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली. त्यामूळे आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या जागी संघाची कमान सांभाळणार आहे. कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करणारा बुमराह हा ३६वा खेळाडू ठरला आहे.

भारतीय संघ १ जुलै रोजी इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीत खेळण्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा संघाची कमान बुमराहच्या हाती असेल. सी.के नायडू यांना भारताकडून सर्वात पहिल्यादा कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचा मान मिळाला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकूण १५ कसोटी कर्णधारांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक यशस्वी कर्णधारांच्या यादीत विराट कोहली विजयांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

भारताचा पहिला विजय
१९३२ पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाला
१९५२ मध्ये पहिला विजय मिळवता आला होता. कर्णधार विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात संघाने एक डाव आणि ८ धावांनी विजय मिळवला होता. या चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने २६६ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पहिला डाव ९ बाद ४५७ धावांवर घोषित केला होता. दुसऱ्या डावात संपूर्ण इंग्लंड संघ १८३ धावांत गारद झाला होता. विनू मंकडने पहिल्या डावात ८ तर दुसऱ्या डावात ४ बळी घेतले होते.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार
कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. ६८ कसोटीत कर्णधार असताना त्याने ४० सामन्यात विजय मिळवून दिला होता. १७ सामन्यात संघाचा पराभव झाला, तर ११ सामने अनिर्णित राहिले होते. यानंतर महेंद्रसिंग धोनीचे नाव आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारताने ६० सामने खेळले यामध्ये २७ कसोटी सामने जिंकले होते. त्याचबरोबर १८ सामन्यात पराभव आणि १५ सामने अनिर्णित राहिले होते. सौरव गांगुलीने ४९ कसोटींपैकी २१ सामने जिंकले आणि १३ सामने गमावले होते तर १५ सामने अनिर्णित राहिले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!