Share

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

Published On: 

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होत. मात्र शिंदे यांचं नाव आता मुख्यमंत्री पदासाठी जाहीर झालं आहे. यानंतर उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरु आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असा आग्रह व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात सहभागी होतील, असे ट्विट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ट्विट करुन सांगितले आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस हे नड्डा यांचा प्रस्ताव स्वीकारणार का ? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं होत. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. गृहखातं, अर्थ आणि विधी व न्याय ही महत्वाची खाती फडणवीसांकडेच राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याआधी देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात नसणार आहेत. मात्र ते बाहेरून सरकार चालवण्यास हातभार लावणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं. यानंतर आता भाजपातून उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत काही नावे समोर आली होती. उपमुख्यमंत्री पदासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे या दोन नावांची जोरदार चर्चा सुरु होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!