🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय उलथापालथीमध्ये भाजप नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली असून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, असे सांगितले. शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 7.30 वाजता शपथ घेतली.
या पार्श्वभूमीवर आता भाजपमध्ये उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याबाबत चढाओढ सुरू असल्याचं चित्र दिसतंय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या घोषणेमुळे राजकीय वातावरणात मोठा भूकंप आला आहे. शिंदे गटातील आमदारांकडून हॉटेल बाहेर येऊन जल्लोष व्यक्त केला जात आहे. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन असं शरद पवार यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. त्याबरोबरच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
“श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.” अशा आशयाच ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 30, 2022
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे केंद्रात मंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष होतील, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असा आग्रह व्यक्त केला आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस हे नड्डा यांचा प्रस्ताव स्वीकारणार का ? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
