Share

Breaking News : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेले दहा दिवस राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्यानंतर अखेर आज महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. काल रात्री उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. यानंतर आज दुपारी पत्रकार परिषदेत राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केले होते. सुरवातीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटत होत. मात्र शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्यात आले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या दोघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय गदारोळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ बांधली जात होती, मात्र एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली.

तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी गोव्याहून मुंबई गाठून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर फडणवीस आणि शिंदे राजभवनात पोहोचले. येथे त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हणजेच २९ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी चर्चा होती. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन सर्वांनाच चकित केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!