🕒 1 min read
मुंबई : काल रात्री राजकोट येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) ८२ धावांच्या फरकाने पराभव करून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने डावाच्या सुरुवातीलाच कर्णधार टेंबा बावुमाला गमावले. डावाच्या चौथ्या षटकात, बावुमा दुखापतीमुळे निवृत्त झाला आणि मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकला नाही.
तिसर्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, बावुमाने वेगवान सिंगल घेण्याच्या प्रयत्नात सूर मारला आणि त्याच्या डाव्या कोपराला दुखापत झाली. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू खेळल्यानंतर बावुमाला दुखापत होत असल्याचे दिसून आले आणि त्यांनी फिजिओला बोलावले. फिजिओने येऊन त्याचा हात तपासला आणि त्याच्या डाव्या कोपराला टेपने झाकण्यात आले.
त्यानंतर बावुमाने हेल्मेट घालून खेळण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अचानक तो अस्वस्थ दिसू लागला आणि त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिका संघ सतत विकेट गमावत असताना बावुमा कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत होता. बावुमाच्या डाव्या हाताच्या कोपरावर काळा गार्ड बांधला होता जेणेकरून त्याच्या कोपराला आधार मिळू शकेल. मैदान सोडल्यानंतरच बावुमा आता फलंदाजीला येणार नसल्याचे स्पष्ट झाले. शेवटच्या टी-२० सामन्यामध्ये फक्त एक दिवसाचे अंतर असल्याने, तो बंगळुरू येथे होणाऱ्या शेवटच्या टी-२० सामन्यातून बाहेर पडू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
