🕒 1 min read
मुंबई : ‘बिग बॉस’ फेम राखी सावंत नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. तिच्या या नवीन रीलेशनशिपमुळे ती सोशल मिडीयावर चर्चेत आहे. आता राखीचा नवा बॉयफ्रेंड आदिल सोबतचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. समोर आलेल्या या व्हिडिओंमध्ये राखी आणि आदिलची हटके स्टाइल पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये राखी आणि आदिल एकमेकांसोबत खूप मस्ती आणि रोमान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये राखी छत्रीसोबत पोज देताना दिसत आहे. त्याचवेळी वारा इतका जोराचा येतो की छत्री सांभाळताना राखीला स्वत:ला सांभाळता येत नाही आणि ती गाडीवर पडते. यासोबतच आदिल राखीला उचलताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/Ce5fADSDxvW/
यासोबतच राखीने इंस्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी आणि आदिल रस्त्यावरच मस्त डान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये राखी आणि आदिल यांच्यामधील जबरदस्त बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. दरम्यान राखी आणि आदिल दोघेही साध्या लूकमध्ये दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/Ce5f77DDxBh/
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
