Share

Sidhu Moose Wala Case : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाला नवे वळण ; संतोष जाधवची पोलिसांना साक्ष

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. (Sidhu Moose Wala Case) लॉरेन्स बिश्नोई टोळीने यासाठी महाराष्ट्रातून दोन शूटर्स बोलावले होते. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ अशी या दोन शूटर्सची नावे आहेत. यापैकी संतोष जाधव (Santosh Jadhav) याने पुणे पोलिसांसमोर (Pune police)  मुसेवाला हत्याकांडप्रकरणी चौकशीदरम्यान काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. संतोष जाधवच्या या नव्या खुलाशानंतर मुसेवाला हत्या प्रकरणाला नवे वळण आले आहे. पंजाब पोलिसांनी संतोष जाधव याचे मुख्य शूटर म्हणून वर्णन केले होते.

सौरभ महाकाळनंतर संतोष जाधवनेही मूस वाला हत्याकांडातील पंजाब पोलिसांचा (Punjab police) दावा फेटाळून लावला आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. संतोष जाधवच्या म्हणण्यानुसार, हत्येच्या वेळी तो गुजरातमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जाधवच्या या दाव्याची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक गुजरात आणि मध्य प्रदेशात पोहोचले आहे.

दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी या प्रकरणी 8 शूटर्सचे फोटो जारी केले होते आणि जाधव हा या हत्येतील मुख्य शूटर असल्याचा दावा केला होता. मात्र संतोष जाधव यांनी माघार घेतल्यानंतर आता या प्रकरणाबाबत नवा ट्विस्ट समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांना मारण्यासाठी चार राज्यातील शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर पंजाबचे, 2 महाराष्ट्राचे, 2 हरियाणाचे आणि राजस्थानच्या एका शूटरला बोलावण्यात आले होते. संतोष जाधवच्या अटकेनंतर हे प्रकरण आता निकाली निघेल, असे वाटत होते. मात्र संतोष जाधव यांनी नकार दिल्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!