Share

IND vs SA 4th T20 : “…तो काहीच शिकलेला नाही”, सुनील गावसकरांची ऋषभ पंतला चपराक!

Published On: 

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) भारतीय संघाचा कर्णधार ऋषभ पंतचा फ्लॉप शो सुरूच आहे. त्याच्या खराब कामगिरीवर अनेक दिग्गजांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही त्याला फटकारले आहे. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यामध्ये पंत स्वस्तात बाद झाल्यानंतर गावसकरांनी भारतीय कर्णधारावर निशाणा साधला आहे.

चौथ्या टी-२० सामन्यात भारताला पुन्हा एकदा प्रथम फलंदाजी करावी लागली आणि संघाने सुरुवातीला काही विकेट गमावल्या. अशा परिस्थितीत कर्णधार पंतला डाव सांभाळण्याची आणि फॉर्ममध्ये परतण्याची मोठी संधी होती पण त्याचा फायदा उठवता आला नाही. त्याने २३ चेंडूत १७ धावा केल्या आणि केशव महाराजच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.

पंतने पुन्हा ज्या प्रकारे विकेट फेकली त्यामुळे गावसकर नाराज दिसले. ते म्हणाले, ”पंत आधीच्या आपल्या चुकांमधून काहीच शिकलेला नाही. ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडूवर तो खेळण्याचा प्रयत्न करतो. अशा स्थितीत तो पूर्ण ताकदीने शॉट खेळू शकत नाही. अशा चेंडूवर मोठे फटके खेळणे त्याला थांबवावे लागेल.” सध्याच्या मालिकेतील चार डावांमध्ये ऋषभ पंत ऑफ स्टम्पच्या बाहेरील चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तीन वेळा बाद झाला आहे. या मालिकेत त्याने ५७ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!