Share

Deepak Chahar Wedding : दीपक चहर अडकला विवाहबंधनात, जया भारद्वाजसोबत घेतले सात फेरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल तुफान चर्चेनंतर आता भारताचा क्रिकेटपटू दीपक चाहरचा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने १ जून २०२२ रोजी त्याची मैत्रीण जया भारद्वाजसोबत सात फेरे घेतले. भारतीय क्रिकेटपटू दीपक चाहर आणि जया भारद्वाज बुधवारी विवाहबंधनात अडकले. दीर्घकाळाच्या रिलेशनशीपनंतर दीपक चाहर आणि त्याची मैत्रीण जया भारद्वाज यांनी १ जून रोजी लग्नगाठ बांधली. फतेहाबाद येथील जेपी पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यापूर्वी मंगळवारी मेहंदीचा कार्यक्रम आणि संगीत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. विवाहसोहळ्यात दीपकने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर जयाने रॉयल वेडिंग लूक देखील कॅरी केला होता. यापूर्वी मेहेंदी आणि संगीताच्या कार्यक्रमात दीपक चाहर आणि जया यांचा स्वदेशी लूक लोकांना भरपूर आवडला होता.

मंगळवारी हॉटेल जेपी पॅलेसमध्ये दीपक आणि जया यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. पहिल्या दिवशी मेहंदी व संगीत कार्यक्रम पार पडले. बुधवारी दुपारच्या वेळी हळदी समारंभ झाला. या हळदीच्या कार्यक्रमात दीपक आणि जया पंजाबी गाण्यांवर नातेवाईकांसोबत नाचताना दिसले होते. यानंतर सायंकाळी साडेसात वाजता हॉटेल जेपी पॅलेसच्या आवारात दीपकची घोडीवर स्वार होत भव्य मिरवणूक निघाली. दीपकचा चुलत भाऊ राहुल चाहर मिरवणुकीत गाण्यांवर थिरकाताना पाहायला मिळाला. बारात्यांना नाचताना पाहून दीपकलाही मोह आवरला नाही आणि त्यानेही भन्नाट डान्स केला. दीपकचे वडील लोकेंद्र सिंह चाहर, बहीण मालती चाहर यांच्यासह नातेवाईक आणि जवळचे मित्र या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

चाहत्यांना दीपकच्या विवाहाची खूपच आतुरता होती. कारण त्याने त्याची मैत्रीण हिला बऱ्याच दिवस अगोदर चेन्नईच्या एका सामन्यादरम्यान अनोख्या पद्धतीने प्रपोज केलं होतं. यानंतर दीपक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत राहिला होता. दीपक एकदाचा विवाहबंधनात अडकल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे, दिल्लीतील रिसेप्शन गुरुवारी हॉटेल आयटीसी मौर्यच्या कमल महल बँक्वेट हॉलमध्ये होणार आहे. त्यात भारतीय संघ आणि आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंचा समावेश असेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!