मुंबई : तीन दशकांहून अधिक काळ भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात गायक ‘केके’ यांचे वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी निधन झाले. कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे ते परत हॉटेलवर गेले तसे ते कोसळले. त्यानंतर त्यांना कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधानानंतर अनेक दिग्गज लोकांनी श्रद्धांजली वाहिली.
केके यांच्या निधनानंतर अभिनेत्री ‘सोना मोहपात्रा’ हिने देखील वक्तव्य केले. ती म्हणाली, “केके यांच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून मला धक्का बसला आहे. काही सेकंद माझ्या मेंदूने काम करणे बंद केले. मलाही अशाचप्रकारे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करता करता मरण यावं असं वाटतं आहे. मला माझे जीवन हे संगीतमय पद्धतीने घालवायचे आहे.”
केके स्टेजवर खूप छान गाणे गात होता. तो जीवन जगताना एकदम साधेपणाने जीवन जगायचा. तो कायम आपल्या शब्दावर ठाम राहायचा. त्याने कधीही कोणाला पराभूत करण्याचा विचार केला नाही. तो कामाच्या बाबतीत खूप प्रामाणिक होता सतत काम करायचा आणि त्याने कधी पार्टीदेखील केली नाही. एक संगीतकार या नात्याने तो नेहमीच माझ्याशी चांगले वागायचा. अस देखील अभिनेत्रीने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

