🕒 1 min read
मुंबई: राज्याची २६,५०० कोटींची थकबाकी असून त्यानुसार १२ हजार कोटींची राज्याची थकबाकी केंद्राकडे कायम असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ५० टक्के पैसे अद्याप केंद्राकडे शिल्लक असल्याचे म्हटले. यावरूनच आता भाजप नेते निलेश राणेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
“अजित पवार म्हणतात GSTचे 50% पैसे मिळाले अजून 15 हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांची नवल वाटते, महाराष्ट्र 5 लाख कोटींचं मोठं व प्रगत राज्य पण GSTच्या 30/40 हजार कोटींवर चर्चा होते. यावरून लक्षात येते अजित पवारांचा फायनान्स विषय कच्चा आहे. बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.
अजित पवार म्हणतात GSTचे 50% पैसे मिळाले अजून 15 हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांची नवल वाटते, महाराष्ट्र 5 लाख कोटींचं मोठं व प्रगत राज्य पण GSTच्या 30/40 हजार कोटींवर चर्चा होते यावरून लक्षात येते अजित पवारांचा finance विषय कच्चा आहे. बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 1, 2022
दरम्यान वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानाची ८६,९१२ कोटींची रक्कम केंद्र सरकारने राज्यांना वितरित असून महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी रुपये आले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- दिव्या ढोले बदनामी प्रकरणात भाजप IT CELL चा हात?: दिपाली सय्यद यांचे मोठे वक्तव्य
- “खंडणी आणि दारूचा महसूल या विषयांची युनिव्हर्सिटी…”, अतुल भातखळकरांचा टोला
- बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होणार?; मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले…
- विद्यमान सरकारने दिलेल्या आश्वासनांचे बुडबुडे निरपराध्यांच्या रक्ताने लाल का?; संजय राऊतांचा सवाल
- “…तरीही जम्मू-काश्मीर अशांतच का?”, संजय राऊतांचा केंद्राला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
