मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी काश्मीरच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा भाजपला घेरले आहे. मागील काही दिवसांपासून काश्मीर कोऱ्यात विविध घडामोडी घडत आहेत. तेथील कायदा व सुव्यवस्था पुन्हा अतिसंवेदनशील बनले आहे. सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यावर हल्ले होत आहेत. काश्मिरी पंडितांमध्ये अस्वस्थता आहे. याच मुद्द्यावर आता संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
“३७० कलम किंवा जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला म्हणून देखील काही फरक पडलेला नाही, कश्मीरी पंडित रस्त्यावर उतरले आहेत आणि सामुदायिक स्थलांतर करण्याचा संदर्भात त्यांनी सरकारला सूचना केली आहे. केंद्रातले सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी आणि प्रखर राष्ट्रवादी आहे. कश्मीरी पंडित यांच्या घरवापसी बाबत आग्रही असलेले सरकार आहे. कश्मीर मधील दहशतवाद संपूर्णपणे खतम होईल, असे सांगणारे सरकार आज कश्मीर मध्ये आमच्या कश्मिरी पंडितांचे जवानांचे आणि अनेक मुस्लिम पोलीस अधिकारी जे या देशाची सेवा करत आहेत, त्यांचे रक्षण करू शकत नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.
“देशाचे गृहमंत्री, प्रधानमंत्री हे केवळ निवडणुका आणि राजकारण याच्यामध्ये गुंतून पडले आहेत, त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे कश्मीर मधील प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालने गरजेचे आहे. दुर्दैवाने फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले आणि ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर याच्यात गुंतलेल्या सरकारला कश्मीरी पंडित यांचा आक्रोश दिसत नाही, हे दुर्दैव आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
“दुर्बिणीने ते काय काय बघतात हे पाहावे लागेल. त्यांच्याकडे दुर्बिणी लावल्या म्हणूनच बाबरी पडत असताना पळून गेले आणि शिवसेनेने पाडली अशा प्रकारचे सत्य कथन भाजपच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर पडले. पाळपुट्यांनी आमच्यावर दुर्बिणी लावू नये. आपल्या स्वतःच्या भूमिका त्यांनी पडताळून पाहायला हव्यात. देशद्रोही या शब्दाची व्याख्याच त्यांच्या विषयी केली होती. भाजपने ती काय होती, अर्थात असे अनेक मासे त्यांच्या गळाला लागत असतात. खोट्या केसेस, सत्तेचा गैरवापर यांच्यामार्फत दबाव आणले जातात. हार्दिक पटेल सुद्धा त्याच एका यंत्रणेचां बळी आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

