Share

मुंबईकरांचा आजपर्यंतचा अनुभव ‘तुंबई’चाच ; अतुल भातखळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Published On: 

मुंबई: जून महिन्यात पाऊस कधीही पडू शकतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी तुंबू नये यासाठी उपाययोजना करण्यास  सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांत पाणी तुंबणारी 386 पैकी तब्बल 282 ठिकाणे कमी करण्यात पालिकेला यश मिळाले आहे. तसेच पावसाळ्यात साचणारे पाणी उपसण्यासाठी 477 उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. मात्र यावरच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

“मुंबईतील पाणी तुंबणारी २८२ ठिकाणे घटली असून ३४ ठिकाणं एकाच वर्षात पूरमुक्त झाली आहेत म्हणे. अजून पावसाची एक सर आली नाही मात्र स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या जाहिरातबाजीचा पूर आला आहे. पहिल्याच पावसात पूर का पूर और पानी का पानी होईल. मुंबईकरांचा आजपर्यंतचा अनुभव मात्र तुंबईचाच आहे.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान मुंबईत दरवर्षी पाणी साचल्याच्या घटना घडतात. यामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासही सहन करावा लागतो. मात्र यंदा मुंबईत नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पालिका उपाययोजना करत असल्याचे आयुक्त पी. वेलरासू यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!