🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये जोस बटलर आणि रवीचंद्रन अश्विन यांचे मंकडिंग प्रकरण खूप गाजले होते. मात्र आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये हे दोघे राजस्थान रॉयल्स संघाचे भाग झाले. स्पर्धेत अश्विन-बटलर चांगले मित्र आणि खेळाडू म्हणून वावरले. या दोघांच्या गळाभेटीचे व्हि़डिओही व्हायरल झाले. आता हंगाम संपल्यानंतर दोघांचा एक व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला आहे.
आयपीएल २०२२ फायनलनंतर ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या बटलरने त्याच्या जर्सीवर खेळाडूंचे ऑटोग्राफ घेतले आणि त्यात अश्विनचे नाव देखील समाविष्ट केले. राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये जोस बटलरने दोन जर्सी घातल्या आहेत आणि त्याने या दोन्ही जर्सीवर अश्विनचे ऑटोग्राफ घेतले.
These two. ???????? #RoyalsFamily | @ashwinravi99 | @josbuttler pic.twitter.com/TB8NoQlAZa
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 30, 2022
आयपीएल २०१९मध्ये, रवीचंद्रन अश्विन आणि जोस बटलर यांच्यात मंकडिंगबाबत बराच वाद झाला होता. अश्विन तेव्हा पंजाब किंग्जकडून खेळत होता तर बटलर राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करत होता. बटलरला अश्विनने मंकडिंग केले.
असा रंगला सामना…
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिल्या हंगामात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले आहे. सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) ७ गड्यांनी मात दिली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकात ९ बाद १३० धावा केल्या. हार्दिक पंड्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या तिघांना बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात गुजरातकडून सलामीवीर शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी सावध आणि संयमी फलंदाजी केली. १९व्या षटकात गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
