Share

आकाश चोप्राच्या ‘टाटा बाय-बाय’ विधानावर पोलार्डनं दिलं प्रत्युत्तर; म्हणाला! “यामुळे कदाचित तुमचा…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कायरन पोलार्डची आयपीएल २०२२ हंगामातील कामगिरी अतिशय खराब होती. गोलंदाजी आणि फलंदाजीतही तो विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याचा परिणाम मुंबई इंडियन्सच्या संघावरही झाला आणि पाचवेळचा चॅम्पियन संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. आपल्या खराब कामगिरीमुळे पोलार्ड अनेकवेळा माजी भारतीय फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राच्या निशाण्यावर आल्याचा पाहायला मिळाला. आकाश चोप्राने अनेक वेळा पोलार्डवर उघडपणे टीका केली. आता लीग संपल्यानंतर पोलार्डनेही आकाश चोप्राला टॅग करत ट्विट केले आहे. ज्यात त्याने लिहिले आहे की, “आशा आहे की चाहता वर्ग आणि फॉलोअर्स वाढतील..असेच चालू ठेवा” मात्र, काही वेळाने पोलार्डने हे ट्विट डिलीट केले.

आता पोलार्डने आकाश चोप्राला टॅग करताना हे ट्विट का केले, याचे कारण स्पष्ट झालेले नाही. पण आयपीएल २०२२ मध्ये पोलार्डच्या खराब कामगिरीबद्दल आकाश चोप्राच्या टीकेशी त्याचा संबंध असू शकतो. वास्तविक पाहता आकाश चोप्राने पोलार्डच्या आयपीएल २०२२ मधील कामगिरीवर एक नव्हे तर अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले होते. पोलार्डने आयपीएलच्या १५ व्या मोसमात १०७ च्या स्ट्राईक रेटने १४४ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर संपूर्ण मोसमात त्याला केवळ ४ विकेट घेता आल्या. त्यामुळे आयपीएल पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानावर राहिला.

पोलार्डचा मुंबईसाठी शेवटचा हंगाम : आकाश चोप्रा
मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “मुंबई संघासोबत पोलार्डचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. मला वाटते की पुढील हंगामात मुंबई इंडियन्स पोलार्डला सांगा बाहेरचा रस्ता दाखव शकते. मुंबई मुरुगन अश्विन (रु. १.६ कोटी), जयदेव उनाडकट (रु. १.३ कोटी) यांनाही संघातून रिलिज करू शकतात. तसेच वेगवान गोलंदाज टायमल मिल्स (रु. १.५ कोटी) यालाही संघ अलविदा म्हणू शकतो.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!